सिरंजणी - शेलोडा रास्ताकामासाठी चोरलेल्या मुरूम व दगडाच्या दंडाची रक्कम
न भरताच गुत्तेदाराची कामाला सुरुवात ...
महसूल बुडीकडे जिल्हाधिकार्यांनी लक्ष देण्याची गरज
सिरंजणी(धम्मा मुनेश्वर)विना परवाना चोरीच्या मार्गाने शासकीय संपत्तीचे उत्खनन करून शेलोडा - सिरंजणी रस्त्याच्या कामात वापर केला जात असल्या प्रकरणी मंडळ अधिकारी यांनी ८८ मुरुम व १०८ ब्रास दगडाच्या ढिगार्याचा पंचनामा करून संबंधित गुत्तेदारास साडेसह लाखाचा दंड भरण्याची नोटीस बजावली होती. तरीसुद्धा राजकीय वरदहस्त प्राप्त असलेल्या गुत्तेदाराने पोलिस पाटलाच्या संगनमताने गौण खनिजाचे ढिगारे पसरवून परस्पर वापर सुरु केला आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी लक्ष देवून दंडाची रक्कम वसूल करून, गुत्तेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे अशी मागणी पर्यावरण प्रेमी नाग्रीकातून केली जात आहे. .........