निवड

संत रविदास गृह निर्माण संस्था अध्यक्षपदी देगलूरकर,सचिवपदी अन्नपूर्णे 

नांदेड(प्रतिनिधी)येथील संत रविदास गृह निर्माण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते चंद्रप्रकाश देगलूरकर यांची तर सचिवपदी सहकार चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते भगवान अन्नपूर्णे यांची बहुमताने निवड करण्यात आली. मागील बऱ्याच वर्षांपासून या संस्थेवर कब्जा कब्जा करून कांही लोकांनी मनमानी चालू केली होती. या नवीन संचालक मंडळामुळे समाजात आनंद निर्माण झाला आहे. 

सिडको नांदेड येथील गुरु रविदास मंदिरात आयोजित चर्मकार समाजाच्या व्यापक बैठकीत संत रविदास गृह निर्माण सहकारी संस्थेवर मागील अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या विद्यमान अध्यक्षाच्या व संचालक मंडळाच्या एकाधिकारशाही आणि मनमानी कारभाराबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली. बैठकीस उपस्थित सर्व सभासदांच्या संमतीने यावेळी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते मा. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखालील नवीन संचालक मंडळाची बहुमताने निवड करण्यात आली. 

नवीन संचालक मंडळ :

अध्यक्ष - चंद्रप्रकाश गंगाधरराव देगलूरकर, उपाध्यक्ष - श्याम बाबुराव निलंगेकर, सचिव - भगवान चान्दोजी अन्नपूर्णे, सहसचिव - विश्वनाथ रामराव घडलिंगे, संचालक - संभाजी देवबाजी देठवे, बालाजी किशनराव साबणे, रामराव नागोराव गंगासागरे, राजेश नागोराव पांढरे, विश्वनाथ वेंकटराव करकले, सौ. पद्मीनबाई विश्वनाथराव बनसोडे आणि सौ. जमुनाबाई ब्रह्माजी गायकवाड. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथराव बनसोडे, वेंकटराव सोनटक्के, ब्रह्माजी गायकवाड, एकनाथराव लाठकर, भगवान तारू, बाबुराव नरहिरे, राजू धडके, किशन दुधंबे, विनोद गंगासागरे,किरण बेन्द्रीकर, बाबुराव पाचकोरे, सुर्यकांत साबळे, मारोती दुधगोंडे, पंढरी हिवरे, सौ. दमयंती गोहिल, नर्मदाबाई चावडा, सौ. गोदावरीबाई वानखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. गुरु रविदास मंदिर समितीच्या वतीने यावेळी नवीन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी