समन्वय चषक स्पर्धा

गुन्हेगारी शिगेला पोचली आणि पोलिसांना सुचतोय खेळ ....
पोलीस- नागरीक जिल्हा स्तरीय समन्वय चषक स्पर्धा 31 ते 7 सप्टेंबर दरम्यान

नांदेड(प्रतिनिधी)जिल्ह्यात दररोज चोऱ्या होत आहेत खून पडत आहेत आणि मन्ग्ल्सुत्रांच्या चोरया,मोटारसायकली आणि बँकेतून काढलेल्या मोठ्या रक्कमेच्या चोऱ्या सुरुचासून सर्वप्रकारची गुन्हेगारी शिगेला पोचली आहे आणि पोलीस खात्याला खेळ सुचत आहेत.नुकत्याच क्रीडा स्पर्धा झालेल्या असताना पुन्हा31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान पोलीस नागरीक समन्वय चषकच्या जिल्हास्तरीय स्पर्धा नांदेडला होणार आहेत.

पोलीस ठाणे स्तरावर विजयी स्पर्धकांनी वेळापत्रकानुसार जिल्हास्तर स्पर्धेत उपस्थीत राहावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले व गृह पोलीस उप अधीक्षक चंद्रभान यशवंत यांनी केले आहे.ऑगस्ट महिन्यात नांदेड जिल्हयाच्या 36 पोलीस स्थानकाअंतर्गत विविध स्पर्धा झाल्या. त्यात विजेत्या स्पर्धकांना पोलीस नागरीक समन्वय चषक व रोख बक्षीसे देण्यात आली. 36 पोलीस स्थानकाअंतर्गत विजेत्यांना आता जिल्हास्तरावर पुन्हा जिंकण्याची संधी आहे. वेळापत्रकानूसार सर्व स्पर्धकांनी दिलेल्या ठिकाणी हजर रहावे, पोलीस मित्र यांच्या विविध गटांनूसार या स्पर्धा होणार आहेत.

1) वाहतूक पोलीस मित्र - निबंध स्पर्धा: दिनांक 31 ऑगस्ट 2013 रोजी वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 स्थळ चिंतन सभागृह पोलीस अधीक्षक कार्यालय,2) बाल पोलीस मित्र - चित्रकला स्पर्धा: दिनांक 1 सप्टेंबर 2013 रोजी वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 स्थळ चिंतन सभागृह पोलीस अधीक्षक कार्यालय,3) छात्र पोलीस मित्र - वकृत्व स्पर्धा: दिनांक 2 सप्टेंबर 2013 रोजी वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 स्थळ चिंतन सभागृह, पोलीस अधीक्षक कार्यालय,4) महिला पोलीस मित्र - रांगोळी स्पर्धा: दिनांक 3 सप्टेंबर 2013 रोजी वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 स्थळ पोलीस अधीक्षक कार्यालय परीसर,5) युवा पोलीस मित्र - टी-20 क्रिकेट स्पर्धा: दिनांक 4 ते 6 सप्टेंबर वेळ सकाळी 11.00 ते सायंकाळी 06.00 स्थळ पोलीस मुख्यालय मैदान,6) जेष्ठ नागरीक पोलीस मित्र - मॅरेथॉन स्पर्धा: दिनांक 7 सप्टेंबर 2013 रोजी वेळ सकाळी 11.00 ते दुपारीस्थळ पोलीस मुख्यालय नांदेड. या पोलीस नागरीक समन्वय चषक स्पर्धेचा समारोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा 7 सप्टेंबर 2013 रोजी सायंकाळी 05.00 वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे.या स्पर्धेतील स्पर्धकांनी हजर राहावे तसेच जनतेतील लोकांनी या स्पर्धामध्ये हजर राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी